Top News

आधार न्युज नेटवर्क मुख्य उपसंपादक ॲड राहुल थोरात यांची राजुरा पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नागपूर येथे झालेल्या विदर्भ स्तरीय द्वितीय अधिवेशनात आधार न्युज नेटवर्क मुख्य उपसंपादक अँड. राहुल थोरात यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे साहेबांच्या हस्ते म. रा.मराठी पत्रकार संघ, राजुराच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

त्याबद्दल आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष अँड. राहुल थोरात यांचे खूप खूप अभिनंदन..!💐💐

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ स्तरीय द्वितीय अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी आधार न्युज नेटवर्क चे मुख्य उपसंपादक ॲड. राहुल थोरात, राजुरा तालुका प्रतिनिधी रत्नाकर पायपरे, राजुरा ग्रामीण प्रतिनिधी जगतसिंग वधावन, महा घडामोडी तालुका प्रतिनिधी लोकेश पारखी, राज्य रिपोर्टर तालुका प्रतिनिधी अनिल गिरमिल्ला उपस्थितीत..!!


ॲड. राहुल अजाबराव थोरात हे नाव आता चंद्रपूर जिल्ह्यातल्या पत्रकारीतेत एक परिचयाचे नाव झाले आहे. राहुल मागील काही वर्षांपासून आधार न्युज नेटवर्क या न्युज पोर्टल मध्ये राजुरा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करु लागला. मागील दिड वर्षापासून आधार न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून पत्रकारीतेत सक्रीय झालेल्या राहुलला आधार न्युज नेटवर्क च्या मुख्य उपसंपादक पदाची जबाबदारी दिली. व त्यांनी दिलेली जबाबदारी स्वीकारून आधार न्युज नेटवर्क च नावं जिल्हाभर चर्चेत ठेवलं. राहुलला सहकार्यही खुप लोकांचे लाभले. याला कारणीभूत तोच व त्याच्यातील शिकण्याची जिद्द. म्हणूनच अनेकांचा त्याला "आधार" मिळाला.

23 व्या वयात राहुलची पत्रकारीतेत एन्ट्री झाली. सुरूवातीला भिती होती खरी, पण निडर असलेल्या राहुलच्या भितीचा बाऊ फार जास्त काळ अडून राहिला नाही.

गावातील समस्यांपासून त्यांनी आपल्या बातम्याची पहिली सुरूवात केली. हळूहळू आजुबाजुच्या गावातून, शहरातून, बातम्या आधार न्युज नेटवर्क पोर्टलशी जुळला व पोर्टलवर बातम्या देऊ लागला. आणि तो हळूहळू तालुक्यातच नाही तर जिल्हाभर परिचीत झाला. तो प्रत्येक राजकीय पक्षातील स्थानिक नेत्यांशी त्याचे फार चांगले संबंध आहेत. व ते प्रत्येकच राहुलला आपलंसा समजतात हि मिळकत फार कमी लोकांना मिळते.

राहुल हा राजुरा तालुक्यातला.... त्याला तालुक्यातील समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबांच्या समस्या या समस्या त्यांनी खुप जवळून पाहिलेला असल्याने. आणि असे समस्या तो वृत्तपत्रात बघत असल्यानेच तो त्याच्या वृत्त वाचण्यातूनच अप्रत्यक्षरित्या पत्रकारतेशी जुळत गेला. पण यात प्रत्यक्ष जुळायचे कसे, समस्या मांडायचे कसे असले प्रश्न त्याला नक्कीच पडले. मात्र काही तरी मिळवण्याची जिद्द यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या लोकांशी तो संपर्क साधू लागला.
आज आधार न्यूज नेटवर्कचं काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यशस्वीपणे सुरू आहे. आधार नेटवर्कने ७६ लक्ष वाचकांचा टप्पा पुर्ण केलेला आहे.
              
             आजमितीला आधार सोबत १० सुशिक्षित व निडर पत्रकारांची साथ आहे. आणि ॲड. राहुल थोरात सारखा जाणता पत्रकार मुख्य उपसंपादक म्हणून आधार न्युज नेटवर्क च्या साथीला आहे.
            
भैरव व राहुल नेहमी बोलतांना म्हणतो की १ कोटी वाचकांपर्यंत आधार पोहचलं तर आपल्या कामाचं चिज होईल. हा विश्र्वास नक्कीच सार्थकी लागेल यात शंका नसणार आहे.
               
       राहुल पत्रकारितेसोबतच बी.ए., एम.एम.सी, ( M.A mass communication) एल.एल.बी. शिक्षण पुर्ण केले. राहुल आपल्या शालेय शिक्षणात पत्रकारितेची सळमिसळ करित नाही. म्हणूनच तो आपलंसं वाटतो. तो प्रत्येक फ्रेम मध्ये आपलं वेगळेपणा जपून असतो.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने