सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा आढळला गोळा
चंद्रपूर:- शनिवारी रात्री महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना पाहिला. आकाशातील हे अद्भूत दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांत पाहायला मिळालं.
अशात चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार लगतच्या जंगलात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला. लाडबोरी गावातील शेतात धातूचे मोठे तुकडे आढळून आलेत. यातला एक गोल तुकडा सगळ्यात मोठा आहे.
पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधत नक्की घटनेची माहिती घेतली. जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडले. लाडबोरी गावात कोसळलेल्या रिंग सदृश्य वस्तूचा अभ्यासकांनी आढावा घेतला आहे.
हा मोठा तुकडा एखादा निकामी उपग्रह वा यानाच्या इंधन टाकीचा तुकडा असावा एवढा मोठा आहे. याशिवाय अन्य धातूचे तुकडेही शेतात पडले आहेत. न्यूझीलंड देशातून प्रक्षेपित झालेल्या रॉकेटचा बूस्टर पार्ट असल्याचा प्राथमिक कयास वर्तवला जात आहे.
मात्र इस्रो अथवा अन्य कुठल्याही अंतराळ संशोधन यंत्रणेनं अशा पद्धतीनं कुठली वस्तू पडली असावी याबाबत अधिकृत खुलासा केलेला नसल्याचं लक्षात आणून दिलं आहे. सद्य पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.. लाडबोरी येथे धातूच्या पत्र्याचे मोठे तुकडे आढळून आल्यामुळे हा प्रकार उल्कापाताचा नसल्याचंही म्हटलं जात आहे. शनिवारी रात्री चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशात अनोखं दृश्य पाहायला मिळालं. कांनी हे दिव्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केले. काही वेळातच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत