Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

तरुणीच्या नृशंस हत्येची उच्चस्तरीय चौकशी करा #chandrapur


आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी
चंद्रपूर:- जिल्ह्यातील भद्रावती तेलवासा येथील सुमठाना शेतशिवारात ४ एप्रिल रोजी एक २२ वर्षीय तरुणीची नृशंस हत्या करून नग्नावस्थेत फेकण्यात आला. अद्यापही या तरुणीची ओळख पटली नसून नराधम आरोपींना शोधण्यात पोलीस यंत्रणेला यश आले नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्हा हा शांत कायदा व सुव्यवस्था अबाधित असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु जिल्ह्यातील भद्रावती तेलवासा येथे एक युवतीचे धडापासून डोके वेगळे केल्याची गंभीर घटना घडली आहे. हि घटना या जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दोन दिवस लोटून देखील नराधम आरोपीला अटक व त्या युवतीची ओळख पटविण्यात अपयश आले आहे. हि बाब गंभीर आहे.
या गंभीर गुन्ह्यात आरोपी नराधमाला आरोपीला तात्काळ अटक झाल्यास या गंभीर गुन्ह्यातील मृत युवतीची ओळख पटणार आहे. पुढे देखील अशा घटना टाळण्यासाठी या आरोपीला तात्काळ अटक होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत