Top News

तालुक्यात पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या #suicide

जिवती:- सततच्या कर्जबाजारीपणामुळे जिवती तालुक्यातील कुंभेझरी या गावाला लागून असलेला नारायनगुडा येथील शेतकरी माधव जळबा वाघमारे वय ६० वर्षे यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारच धोरण फक्त शेतकऱ्यांच मरण हाच दिसत आहे, जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही व कोणतेही अनुदान सरकार कडून मिळत नाही कर्ज काढून जगावं लागत आणि कर्ज घेऊनच शेती करावं लागतं वरून शेतमालाला भाव मिळत नाही वरून निसर्गाचं मार मग हा शेतकरी जगावं तरी कसं...!
जिवती तालुक्यात एका महिन्यात ०५ ते १० आत्महत्या होत असतात पण कोणी यावर विचार करत नाही की ही शेतकरी आत्महत्या का होत आहे या मागचा कारण काय खोलवर जाऊन कोणीच बघत नाही, शेतकरी आत्महत्येचा मूळ कारण म्हणजे जमिनीचे पट्टे चा आहे शासनाने जर तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले तर 99% शेतकरी आत्महत्या थांबेल कारण ज्यांच्याकडे पट्टे च नाही त्यांना कोणतीच योजनेचा लाभ घेता येत नाही कोणताही अनुदान त्यांना मिळत नाही, मग त्यांना कर्जापायी एकच मार्ग दिसतो तो म्हणजे आत्महत्या? मग महाविकास आघाडी सरकारच धोरण काय? फक्त शेतकऱ्यांचा मरण हाच का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने