Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

शेतात बैल घेऊन गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
मुल:- बैल घेऊन शेतावर गेलेल्या एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना मूल तालुक्यातील मारोडा गावानजीकच्या जंगलात शनिवारी उघडकीस आली. गजानन गुरनूले (वय-६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मूल तालुक्यातील मारोडा गावाचा रहिवाशी असलेले गजानन गुरनूले नेहमीप्रमाणे गावाजवळच्या शेतात बैल चारावयास घेऊन गेले होता. संध्याकाळच्या वेळीस गावात बैल आले. पण गजानन परत न आल्याने शोधाशोध करण्यात आली. जिथे तो बैल चारावायला घेऊन गेला होता. त्या शेतात रात्रीच्या ८.३० च्या दरम्यान त्याची टोपी आणि धोतर आढळून आले.
त्याच दिशेने शोध घेतला असता सोमनाथ डोंगराच्या पायथ्याशी डोंगरदेवीच्या जवळ गजाननचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती वन विभागाला तसेच पोलिसांना देण्यात आली. वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला. दरम्यान, गजानन गुरनूले या शेतकऱ्यावर मागील वर्षी २०२१ च्या उन्हाळ्यात वाघाने हल्ला केला होता. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून तो जखमी झाला होता. मात्र, शनिवारी त्याच्यावर झालेल्या वाघाच्या हल्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने मारोडा गावात वाघाची दहशत पसरली आहे.
वनविभागाकडून कुटुंबीयांना २५ हजाराची मदत

सध्या मारोडा गावाच्या शेतशिवारात वाघाचा वावर वाढला आहे. या घटनेनंतर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. वनविभागाकडून कुटुंबियांना २५ हजाराची तत्काळ मदत करण्यात आली आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर, क्षेत्र सहाय्यक बी. एस. पाकेवार व वनकर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत