सामाजिक न्याय विभागाच्या योजना लोकांच्या दारी #chandrapur

Bhairav Diwase
समाजकार्य महाविद्यालयाचा उपक्रम
सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवर समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथील विद्याथ्यान्नि महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून भिवापूर वॉर्डात नागरिक्कांना समाजिक न्याय विभागात वतीने नागरिक्कांना राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली.
मा. अमोल यावलीकर साहेब सहायक्क आयुक्त समाजकल्याण चंद्रपूर यांच्या माध्यमातून
मा.प्राचार्य डॉ सुनील साकुरे सर यांच्या मार्गदर्शनात व मार्गदर्शिका प्रा.डॉ.प्रगती नरखेडकर यांच्या नेतृत्वात लुंबीनी बुद्ध विहार मातानगर चौक, भिवापूर वॉर्ड चंद्रपूर याठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.मंगला आकरे नगरसेविका,मार्गदर्शक मा.शुभम मादक यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून लाभलेले शुभम मादक यांनी उपस्थिती असणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशश्र्वितेसाठी मार्गदर्शिका प्रा.डॉ.प्रगती नरखेडकर यांच्या मार्गदर्शनात एम. एस. डब्ल्यु. प्रथम वर्षाचे विद्यार्थी हर्षल कारमेंगे, पंकज निखाडे, रोशन नन्नावरे व भिवापूर वॉर्डात क्षेत्रकार्य करणाऱ्या विद्यार्थांनी मेहनत घेतली.