Click Here...👇👇👇

चंद्रपुर शहरातील नझुल जागेवर राहत असलेल्या नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनाचे लाभ द्या #chandrapur

Bhairav Diwase

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आकाश मस्के यांची डॉ. भागवत कराड केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:- चंद्रपुर शहर हे औद्योगील शहर असुन या शहरात 80% नागरीक नझुल जागेवर 50 वर्षे अगोदर पासून राहत आहे. शहरात गोंड राजे नामक किल्ला असुन जास्तीत जास्त नागरीक 300 मि. मध्ये येत असल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना पासुन वंचित होत आहे. म्हणून 300 मी. पैकी 50 मि. अट करण्यात यावे. त्यामुळे शहरातील नागरीकांना जास्तीत जास्त प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळेल.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभ चंद्रपूरातील झोपडपट्टीतील धारकांना मिळावा यासाठी लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश मस्के यांनी डॉ. भागवत कराड केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांना दि. 30/5/2022 ला आज निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी, भाजयुमो पदाधिकारी उपस्थित होते.