Click Here...👇👇👇

पहाडावर पडला कोरडा दुष्काळ #Jiwati

Bhairav Diwase

आसापूर ग्रामवासीयांना तात्काळ टँकर ची सोय करून द्या:- सुदाम राठोड
जिवती:- जिवती तालुक्यातील ग्रा. प. आसापूर अंतर्गत आसापूर येत असून या गावातील मागील ऑक्टोबर महिन्यात पिण्याच्या पाण्याची विहीर ढासळली, दुसरे बोर विहीर आहे. पण पूर्णपणे कोरडे पडलेले आहे. गावकऱ्यांना सद्यस्थितीत पिण्याला एक थेंबही पाणी नाही, गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ही समस्या सांगितली पण त्यांच्या समस्यांचे हल झालेले नाही मग हे प्रशासकीय अधिकारी फक्त पगार घेण्यासाठीच आहे का असा प्रश्न गावकऱ्यांनी मांडला आहे.
जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी आज आसापूर ग्रामवासीयांची समस्या घेऊन गट विकास अधिकारी जिवती यांचेकडे निवेदन देऊन तात्काळ टँकर ची सुविधा गावकऱ्यांना करून द्या. अन्यथा जय विदर्भ पार्टी रस्त्यावर उतरेल अश्या प्रकारचा आंदोलनाचा इशारा सुदाम राठोड यांनी केला आहे. यावेळी उपस्थित महादेव सोयाम, दिनेश सोयाम, बापूराव उईके व आसापूर ग्रामवासी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.