Top News

देवाडा बुद्रुक येथील रानडुकराच्या शिकार प्रकरणात पुन्हा सहा अटकेत #arrested

आरोपींची संख्या वाढून १६ वर
पोंभूर्णा :- पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणार्‍या भुजला नवेगाव वन नियत क्षेत्रातील देवाडा बुद्रुक शेतशिवारात कुत्र्याच्या सहाय्याने रानडुक्कराची शिकार केल्या प्रकरणी वनविभागाने १३ जून ला दहा जणांना अटक केली होती.व त्यांना एक रात्र पोंभूर्णा वनकोठडीत ठेवण्यात आले होते. चौकशी अंती या घटनेतील आणखी आरोपींचा शोध घेऊन या गुन्ह्यातील सहा जणांना १४ जूनला सकाळी अटक करण्यात आले.
घोसरी वनक्षेत्रातील भुजला नवेगाव वन नियत क्षेत्रातील देवाडा बुद्रुक शेत शिवारातील शेतात काही लोकांनी कुत्र्याच्या सहाय्याने रानडुकराची शिकार केली असल्याची माहिती वनविभागाला माहिती मिळाल्याने वनविभागाने १३ जून ला शिताफीने दहा आरोपींना ताब्यात घेतले. या शिकार प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश असल्याने चौकशी करून या गुन्ह्यातील आणखी सहा आरोपींना ताब्यात घेऊन कार्यवाही करण्यात आली.
वनविभागाने १४ जून ला सर्व १६ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामीन मंजूर केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक श्वेता बोडडु , सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने