कर्तव्य बजावून घरी परतताना महिला पोलिसावर काळाचा घाला #chandrapur #Rajura #police #acci

Bhairav Diwase
अपघातात जागीच मृत्यू

राजुरा:- एका आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला पोलिस कर्मचारी ठार झाल्या आहेत. बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी ड्युटी संपल्याने कामावरुन घरी जात असताना त्यांना मागून आयशर ट्रकने धडक दिल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मोनल बनकर असं अपघातात मृत्यू झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मोनल या आपले दैनंदीन कर्तव्य बजावून त्यांच्या राजुरा येथील राहत्या घरी निघाल्या होत्या. मोनल या राजुरा तहसील कार्यालय मार्गावरील वर्दळीच्या भागातून जात असताना त्यांना आयशर ट्रकने मागून दिल्य़ाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
एका कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुकीमुळेच या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा बळी गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.