जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या वतीने सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्वाला सुरुवात #chandrapur

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची माहिती
चंद्रपूर:- केंद्रातील भाजपा सरकारला ०८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्वाला सुरुवात झाली आहे. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील व २२ मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून जिल्हाभर विविधांगी कार्यक्रमांनी हे पर्व साजरे करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिली.
जिल्ह्यात १० जून पासून या पर्वाची सुरुवात झाली असून १९ जूनपर्यंत याअंतर्गत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाभरात जनसंपर्क व जनसंवाद कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत.
विश्वगौरव, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वातील केंद्र सरकारला ०८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या नेतृत्वात समाजातील गोरगरीब, शोषीत, वंचित, शेतकरी, महीला आणि तरूणांच्या कल्याणासाठी अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते घरोघरी, बांधावर, चौकात जनसंपर्क करून केंद्र सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांची माहिती, मोदी सरकारची आठ वर्षातील कामगिरी, विविध घटकांसाठीच्या योजना, उपलब्धी यांची चर्चा करणार आहेत. या पर्वाअंतर्गत शेतकरी संवाद, महिला संमेलन, अनुसूचित जाती व जमाती संमेलन, बिरसा मुंडा पुण्यतिथी कार्यक्रम, शहरी गरीब भेटी, उल्लेखनीय सामाजिक कार्य करणार्‍यांचे सन्मान, लसीकरण शिबीर व जनजागृती, केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार तसेच जिल्ह्यातील प्रज्ञावंताचे सन्मान यांसह विविध प्रकारचे सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
१० जूनपासून प्रत्येक दिवशी एका विषयावर कार्यक्रम प्रत्येक मंडळावर आयोजित केल्या जाणार आहे. १२ तारखेपर्यंत जिल्ह्यात शेतकरी संवाद, महिला संमेलन व दलितवस्तीस भेट कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती भोंगळे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत