जाहिरात... Advertisement... विज्ञापन

हा विजय तर पक्का होता,सत्याचा होता,होणारच होता #Chandrapur

भाजपा युवानेते महेश कोलावार यांचे वक्तव्य


चंद्रपूर:- हा विजय तर पक्का होता,सत्याचा होता,होणारच होता असे वक्तव्य भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी केले आहे. काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीच्या निकालासंदर्भात महेश कोलावार आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की भाजपच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय होणे यात काही नवल नाही,हा विजय तर होणारच होता व सत्याचाही होता.
आघाडी सरकार वारंवार केंद्र सरकारवर हल्लाबोल केला व सामान्य जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल रोष निर्माण करण्याचे कृती केले.तरीही भारतीय जनता पक्षानी राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणूकीत बाजी मारली.परत एकदा या निकालाने राज्यसभेसारखीच विधान परिषदेच्या विजयाची पुनरावृत्ती झाली.
सामान्य जनतेच्या विश्वासासोबत पक्षाच्या आमदारांचीही साथ देवेंद्र फडसवीसांसोबत असल्यामुळे हा विजय केवळ विधान परिषदेचाच नव्हे तर हा विजय देवेंद्र फडणवीसांवर दाखवलेल्या आमदारांचा विश्वासाचा आहे असे भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी यावेळी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत