भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या #bhamragad

Bhairav Diwase
भामरागड:- तालुक्यातील मलमपोडूर या गावात तेंदुपत्ता फळीवर मुन्शी म्हणून काम पाहणाऱ्या एका व्यक्तीची नक्षलवाद्यांनी अपहरण करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
लकीकुमार ओक्सा (३८ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मूळचा बिनागुंडा येथील रहिवासी असलेल्या लकीकुमारला नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री १० वाजतादरम्यान मलमपोडूर गावातून झोपेतून उठवून सोबत नेले.
नंतर जंगलात धारदार शस्त्राने त्याची हत्या करून मृतदेह गावाबाहेर फेकून दिला. आज सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांना त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबात पोलिसांना माहिती देण्यात आली.