चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी स्थापित केंद्र सरकारला ८ वर्ष पूर्ण झालेल्यानिमित्त आयोजित करणा-या सेवा,सुशासन व गरिब कल्याण सेवा कार्यक्रमाच्या समितीची कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली.यात राष्ट्रीय पोषण अभियान समितीच्या संयोजकपदी मंजूश्री कासनगोट्टुवार यांची तर सहसंयोजकपदी प्रज्ञा बोरगमवार, महेश कोलावार यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्त झालेल्या पदाधिका-यांनी या नियुक्तीचे श्रेय माजी अर्थमंञी आ.सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंञी हंसराज अहिर,भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ.मंगेश गुलवाडे, संघटन महामंञी राजेंद्र गांधी,महानगर जिल्हा महामंञी ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, रवी गुरनुले यांना दिले आहे.