Top News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजुरा शहरात स्वच्छता मोहीम व विविध ठिकाणी वृक्षारोपण.#environment

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुराचे स्तुत्य उपक्रम.


राजुरा:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा-राजुरा तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता अभियान तसेच वृक्षारोपण हे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
दरवर्षी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे , समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्या मागचा हेतू आहे .

   त्याकरिता आज दि. 5 जून रोजी सकाळी ६:०० वाजता पासून वर्धा नदी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . त्यानंतर सकाळी १०:०० वाजता पासून राजुरा शहरातील जगन्नाथ बाबा मंदिर परिसर, साईनगर व रमाबाई वार्ड मधील पाण्याच्या  टाकी जवळील मोकळ्या जागेवर तसेच विविध ठिकाणी बेल, कडुनिंब, आवळा अशा विविध प्रकारचे रोपटे लावण्यात आले. 

       कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ पत्रकार उमाकांत धोटे, अँड. चंद्रशेखर चांदेकर, डॉ. दादा आवारी, प्रा. नुगुरवार, भागवत सर, कुलमेथे सर, उपरे सर, तसेच साईनगर येथील प्रतिष्ठित नागरिक व युवकांची प्रमुख उपस्थिती होती.

     कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुराचे मार्गदर्शक प्रा. अनंत डोंगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल थोरात, सचिव रत्नाकर पायपरे, कार्याध्यक्ष सतीश शिंदे, उपाध्यक्ष प्रवीण मेकर्तीवार, संतोष मेश्राम, सहसचिव संजय रामटेके, संघटक जगतसिंग वधावन, कोषाध्यक्ष राकेश कलेगुरवार, प्रसिद्धी प्रमुख अनिलकुमार गिरमिल्ला, सदस्य संतोष देरकर, लोकेश पारखी, कैलास कार्लेकर, अंकुश भोंगळे, ओंकार आस्वले, गौरव कोडापे, उज्वल भटारकर, रुपेश वाटेकर, वैभव धोटे यांनी परिश्रम घेतले.


    कार्यक्रमाला श्री. संकेत नंदबंशी साहेब न. प. राजुरा, वन परिक्षेत्र अधिकारी श्री. सुरेश येलकेवाड साहेब, पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे, जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने