💻

💻

वाघाशी झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू #gadchiroli


गडचिरोली:- वनपरिक्षेत्रातील गडचिरोली बिटामधील कक्ष क्रमांक 171 मध्ये बिबट वन्यप्राण्याची मृत शरीर आज 26 जुलै 2022 रोजी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास वनकर्मचान्यास गस्ती दरम्यान आढळून आले. माहिती मिळाल्यावरुन मिलिश दत्त शर्मा, उप वनसंरक्षक, गडचिरोली यांचे मार्गदर्शना खाली सोनल भडके, सहायक वनसरक्षक, गडचिरोली वनविभाग व अरविंद पेंदाम, वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली (प्रादे.), श्रीकांत नवघरे, क्षेत्रसहायक, गडचिरोली, बि.पी. राठोड, वनरक्षक, गडचिरोली, भसारकर, वनरक्षक बोदली, गौरव हेमके, वनरक्षक, चांदाळा व वाघ संनियंत्रक पथक, गडचिरोली व अधिनस्त संपुर्ण वनाधिकारी / कर्मचारी यांनी घटना स्थळावर जाऊन पाहणी केली असता, सदर घटनास्थळ कक्ष क्रमांक 171 मधील वाकडी गावालगतच्या झुडपी जंगलात घडली असून मौका स्थळाची पाहणी केली असता, मृत बिबटच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आले.


तसेच मृत शरीर असलेल्या आजुबाजुच्या परिसरात पटटेदार वाघाचे पाऊलखुना आढळुन आल्या तसेच जवळच पटटेदार वाघ व बिबट यांच्यात झुंज झाल्याचे निशान दिसुन आले. त्यामुळे सदर बिबट वन्यप्राणी हा वाघाच्या हल्ल्यात मृत झाल्याचे प्रथम दर्शनी अंदाज आहे. सदर प्रकरणात शवविच्छेदन करण्याकरीता पशुधन विकास अधिकारी श्रेणी-1, येवली डॉ. चेतन नंदनवार व पशुधन विकास अधिकारी श्रेणी-1, गुरखळा डॉ. श्रध्देय सिरणकर हे उपस्थीत होते. दोनही अधिकाऱ्यांनी मृत शरीराची शवविच्छेदन करून रासायनिक तपासणी करीता नमुने घेतले आहे. मृत बिबटयाच्या शरीरावरील जखमावरुन पटटेदार वाघाने हल्ला करुन बिबटयास ठार केल्याचे प्राथमिक अंदाज डॉ. चेतन नंदनवार व डॉ. श्रध्देय सिरणकर यांनी व्यक्त केला. सदर संपूर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद रक्षक मिलींद उमरे व वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर तसेच ग्रामपंचायत वाकडी येथील सरपंच सौ. सरिता भास्कर चौधरी व पोलीस पाटील देवेंद्र केशव वाकडे हे सुध्दा उपस्थीत होते. मृत बिबटयाचे शवविच्छेदन करून मृत शरीरास अग्नी देऊन उपरोक्त सर्वांसमक्ष नष्ट करण्यात आले.
सदर प्रकरणावरुन वाघ व बिबट यांच्यात झुंज झाली असल्याने वाघ सुध्दा यात जखमी झालेला असावा असे प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला असुन घटना स्थळाच्या आजुबाजुच्या जंगल परिसरात गावकन्यांनी जाऊ नये व आपले पाळीव प्राणी सुध्दा या भागातील जंगलात नेऊ नये असे आव्हान सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली सोनल भडके तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली अरविंद पेंदाम यांनी केलेले आहे. सदर घटनेची चौकशी उप वनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांचे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली अरविंद पेंदाम हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत