Top News

सामान्य माणसातला युवालाॅजी म्हणजे बालाजी मेश्राम #chandrapur #pombhurna

श्री. बालाजी मेश्राम (बालू) नगरसेवक नगरपंचायत पोंभूर्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
पोंभूर्णा नगरपंचायतच्या वार्ड नंबर १ (चेक पोंभूर्णा) येथील बालाजी मेश्राम हा डोळ्यात सामाजीक कार्याचं तुफान साठवून धडपडणारा युवा. प्रेमाने त्याला बालू म्हणतात. बालाजी हा खरं तर सामान्य माणूस. म्हणूनच त्याचे स्वप्नही सामान्यच. ज्या गावकुसात, ज्या वार्डात तो राहतो येथील सर्वांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात बस एवढंच काय तो स्वप्न. तो युवकांमध्ये परिचीत आहे.तो आबालवृद्धांमध्ये परिचीत आहे.
कुणी त्याला आवाज दिली की तो समाजसेवेसाठी तयार असतो. हिच त्याची छबी त्याच्यातील वेगळेपणा अधोरेखित करणारी आहे. अनेकदा कुणाला दवाखान्यात घेऊन जायचं असलं की तो पुढे असतो. हि त्याच्या समाजकार्याची पहिली सुरूवात. त्याला प्रवास करणं आवडतो हि त्याची हाॅबी. त्याने या त्याच्या हाॅबीलाच त्याचं प्रोफेशन बनवून टाकलं. त्याने छोटासा ट्रव्हलींग चा व्यवसाय सुरू केला आहे.आणि यातून त्याची रोजमराची जिंदगी जगतो आहे.तो शेती व्यवसाय आवडीने करतो. बस एक साधी सरळ लाईफ. पण हे सर्व सामान्य माणसासारखं व्यवस्थीत होत असताना बालाजीला आजूबाजूची (वार्ड नं. १) परिस्थिती जी विकास म्हणवून घेणाऱ्या चौकटतीत जे अनेक पैलू अविकसीत असल्या सारखे वाटायचे हे बघून त्याला वाटायचं की कुठंतरी हे बदलायला हवं. हताश होणारा हा युवा कुठेतरी आतल्या आत घुसमटत राहायचा. पण म्हणतात ना की "जिंदगी में मोड तो कहिसेभी आ सकता है. खरं तर समाजकार्य असो की राजकारण "युवाओने कुछ मिसाले रख दि है रास्ते मोडकर " हेच कारण असतं काही तरी बदल घडण्याची. बालाजीने आपली सुरूवात केली ती म्हणजे खऱ्या अर्थाने राजकारणातूनच. पण हे राजकारण त्याचं नव्हतंच. त्याची भाषाही त्याला माहित नसावी. मग सुरूवात कुठून करायची हा प्रश्न त्याच्यासमोर आवासून उभा राहिला. त्यांनी सत्तेत असलेल्या व महाराष्ट्रात ज्याची वाघासारखी ओळख असलेल्या पक्षाने त्याला आकर्षीत केले तो पक्ष म्हणजे शिवसेना. त्याला एक कारणही सब्बळ होता.
स्थानीक स्वराज संस्थेची निवडणूक (नगर पंचायत) शिवसेनेचा उमेदवार म्हणून तो रिंगणात उतरला आणि तो यात सर्व शक्तीने उभा राहिला. इतकंच काय तर तो लढला. राजकारणात दिग्गज असलेल्या नेत्याला नमवून तो विजयाचा मुकूट चढवून नगरपंचायतमधील दालनात प्रवेश केला.
सामान्य माणूस ज्याला नगरसेवक या नावाने यामुळे एक वेगळी शक्ती मिळाली. यामुळे ज्या लोकांचा विचार मनात यायचा त्यांचे अडचणी,त्यांचे प्रश्न हे तो सोडवू शकणार होता.किमान ते तो प्रश्न प्रशासनापुढे रेटून धरू शकणार होता. स्वंच्छंद उडणारा युवा ते राजकारण व्हाया समाजसेवा हा कदाचित त्याच्यासाठीचा छोटासा स्वप्न तो पुर्ण झाला.... आता खरी इनिंग सुरू होणार आहे. राजकारणाच्या लोकरातून समाजसेवेचं व्रत पुर्ण करण्याची. तो हे कितपत पुर्ण करणार हे त्याच्यावरच आहे. पण युवा बालाजी हि समाजसेवेची गाडी नक्कीच वेगात चालवेल अशी आशा बाळगू तो यात हि विजयी होईल.
एक शायरी जी माझ्या वाचनात आली -

"यूं अपनी जिंदगी को बेकार मत कर...!
बिना कोशिश के जीत का इंतजार मत कर...!
जोश और ज़ुनून से कुछ भी हासिल किया जा सकता है..!
तू जीतने के लिए हार को स्वीकार मत कर....!!


पोंभूर्णा नगरपंचायतचे नगरसेवक
श्री.बालाजी मेश्राम (बालू)
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂🎂💐💐

आपली राजकीय व सामाजिक चळवळ पुन्ह: पुन्ह फुलत राहो. आपल्या हातून समाजकार्य घडत राहो हीच सदिच्छा....💐💐


- सुरज गोरंतवार ,पोंभूर्णा
२६/०६/२०२२

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने