वाघाच्या हल्ल्यात तरुण जागीच ठार #death #Tiger #tigerattack

Bhairav Diwase

गडचिरोली:- जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या तरुणावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ताे जागीच ठार झाला आहे. काल सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे घडलेल्‍या घटनेने खळबळ उडाली आहे.
किशोर मामीडवार हा काल सकाळी जंगलात सरपण आणण्यासाठी गेला होता. याचदरम्यान वाघाने त्‍याच्‍यावर हल्ला केला. काही वेळानंतर गावकऱ्यांना पोर्ला वनपरिक्षेत्रातील (कक्ष क्र. ६) राखीव जंगलात किशोर यांचा मृतदेह आढळून आला. याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.