जगदंब ढोल ताशा पथक, चंद्रपुर तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपुर:- चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रगणिक असलेले जगदंब ढोल ताशा पथक, चंद्रपुर तर्फे पथकातील 10 वी व 12 वी मधील उत्तीर्ण विद्यार्थाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिनांक 26 जुन 2022 रोजी खेड्डुले कुणबी समाज सभागृहात पार पडला .
या सोहळ्याचा अध्यक्ष पदी राजीव गांधी इंजिनियरींग कॉलेज, चंद्रपुर चे प्राचार्य अभय निलावार यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणुन ॲड. मनश्री अंबाडे यांची उपस्थिती लाभली.
इयत्ता 12 वी मधील सुनिता साहु, सरोज साहु प्रतिक्षा पल्हाडे, ऋतुजा लोडे, प्रज्वल इंटनकर, साहील केशट्टीवार, आशुतोष देवाळकर यांना पुरस्कृत करण्यात आले. व इयत्ता 10 वी मधील योगिता साहु, ईशा बोबडे, मिताली तडसे, वैभवी क्षिरसागर, रेणुका साहू, आर्यन कुळमेथे, ओम कोमजपल्लीवार, दुशांत पाल, देवांशु अस्वले यांना पुरस्कृत करण्यात आले.
जगदंब ढोल ताशा पथक, चंद्रपुर नेहमीच सांस्कृतीक वारसा जपत सामाजिक कार्यात अग्रेसर राहलेला आहे. विद्यार्थाचे मनोबल वाढविण्याचा दृष्टीने या प्रकारचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आली. अशी माहिती पथकप्रमुख प्रशांत मातुरवार यांनी दिली.
सदर आयोजनाचे सुत्रसंचालन शितल मंगरूळकर यांनी केले. व आयोजनाच्या यशस्वीतेकरीता धनेश राही. शुभम कल्लुवार, अभि दिकोंडवार, सागर मुक्कावार, प्रथम दिकोंडवार, शुभम भोयर, अंकीत पारधी, शुभम मंगरूळकर, शुभम वानखेडे, प्रिती सोयाम, दिशा बोबडे, सोनल देवाळकर, भाग्यश्री देशमुख व पथकातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.