महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात #arrested

सहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात महावितरण कार्यालयात एसीबी (ACB)ने धाड टाकत सहायक अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
श्रीनु चुक्का असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. चक्का यांना 6 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. सोलर यंत्रणा उभारणाऱ्या कंत्राटदाराने एसीबीला तक्रार केली होती. ग्राहकाला सौर यंत्रणा किट देण्यासाठी अभियंत्याने लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारीनुसार एसीबीने सापळा रचून अभियंत्याला कार्यालयात स्वतः लाच स्वीकारताना अटक केले. प्रकरणाचा अधिक तपास एसीबी करत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या महावितरण कार्यालयात एसीबीने धाड टाकली. महावितरणचे सहायक अभियंता श्रीनु चुक्का यांना 6 हजार रुपयाची लाच घेताना अटक केली आहे. घरगुती वीज कनेक्शन असलेल्या ग्राहकाच्या घरी सोलर यंत्रणा उभारणाऱ्या कंत्राटदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार केली होती. ग्राहकाला सौर यंत्रणा किट देण्यासाठी अभियंत्याने सहा हजार रुपये लाचेची डिमांड केली होती. एसीबी पथकाने कार्यालयात स्वतः लाच स्वीकारताना अभियंत्याला अटक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत