नागभीड तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन #chandrapur #Nagbhid

Bhairav Diwase
चंद्रपूर:- जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत पथदिवे विद्युत बिलाच्या रकमेचा भरणा जिल्हा परिषद स्तरावरून करावा व वीज कनेक्शन कापण्याची मोहीम थांबवावी व ग्रामपंचायत ची पथदिवे कनेक्शन कापले आहेत त्या ग्रामपंचायत ची विद्युत जोडणी तात्काळ करावी. अशी मागणी घेऊन आज दिनांक 27 जून 2022 ला नागभीड तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन केले.
🌄
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावरील पथदिव्यांची वीज बिल भरणा करण्याचे कळविण्यात आले आहे. जिल्हा परिषद मार्फत अधीक्षक अभियंता महा.‌‌ वि. वि. कंपनी संचालन व सुव्यवस्था विभाग चंद्रपूर यांना पत्र देऊन पथदिवे विद्युत कपात करण्याच्या सात दिवस आधी पत्र द्यावे व नंतर कारवाई करावी असे म्हटले आहे. मात्र कुठल्याही ग्रामपंचायतला पथदिवे थकीत व चालू वीज बिल भरणे शक्य नाही या आधी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत चे पथदिव्यांची विद्युत बिल जिल्हा परिषद मार्फत भरण्यात येत होते. यापुढे सुद्धा जिल्हा परिषद मार्फत पथदिवे विद्युत बिल भरणा करण्यात यावे व ताबडतोब पथदिव्यांची वीज कनेक्शन कापण्याची मोहीम थांबवावी व ज्या ग्रामपंचायती वीज कनेक्शन कापले आहेत अशा ग्रामपंचायतचे त्वरित वीज जोडणी करून देण्यात यावी अशी मागणी घेऊन आज दिनांक 27 जून 2022 ला नागभीड तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन केले. जिल्हा परिषद चे दार न उघडल्यामुळे सरपंच संघटनांनी जिल्हा परिषद च्या समोरील मार्गावर आक्रोश आंदोलन उभारले रस्त्यावर आंदोलन उभारल्यामुळे काही काळ गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.‌