अज्ञात ट्रकने म्हैसींना चिरडले #Chamorshi

Bhairav Diwase
0


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- अज्ञात ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या म्हैसींना चिरडल्याने तीन म्हैसींचा जागीच मृत्यू झाला तर दोन म्हैसी गंभीर जखमी झाल्याची घटना 27 जून रोजी पहाटेच्या सुमारास येनापूर येथील पेट्रोल पंपाजवळी घडली. त्यामुळे म्हैस मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार येनापूर येथील शेतकरी सुरेश जक्कूलवार यांच्या मालकीच्या पाच म्हैसी चरायला सोडल्या होत्या. सदर म्हैसी रात्रभर घरी न येता येथील पेट्रोल पंपानजीकच्या रस्त्यावर उभ्या होत्या.
दरम्यान, पहाटेच्या सुमारास अज्ञात ट्रकचालकाने पाचही म्हैसींना चिरडत नेले. यामध्ये तीन म्हैसींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन म्हैसी गंभीर जखमी झाल्या. अपघात घडताच अज्ञात ट्रकचालक पसार झाला. घटनेची माहिती म्हैस मालकाला मिळताच, त्याने घटनास्थळ गाठले.
उपचारादरम्यान एका म्हैसीचा मृत्यू झाला. चार म्हैसी ठार झाल्याने शेतकरी सुरेश जक्कूलवार यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वी अशाच रस्त्यावर उभ्या असलेल्या एका म्हैसीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. तसेच जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंताही व्यक्त करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)