💻

💻

जिवती तालुक्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसामुळे नुकसान #Jivati

#InSort 
त्वरित पंचनामे करून मदत मिळावी; माजी उपसभापती महेश देवकते यांची मागणी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने चिखली खुर्द, कुंभेझरी, हिमायतनगर, भारी, शेडवाई, नंदापा, सेवादासनगर, परमडोली, गुडशेला, पुदीयल मोहदा, वणी खुर्द, कमरकोंडी, नगराळा या गावात नुकसान झाले आहे.
वादळीवाऱ्याने गावातील घराचे टिनपत्री उडुन गेले आहे. काहीच्या घरावर गावातील झाड तुटून पडले आहे. तर घरामध्ये पाणी घुसले आहेत. जिवती तालुक्यात झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी उपसभापती महेश देवकते यांची केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत