महानगरात रक्तदान शिबीर संपन्न #blooddonation

Bhairav Diwase

चंद्रपूर:- अष्ट पुरती वर्षानिमित्त म्हणजेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकालास आठ वर्ष पूर्ण झाली म्हणून माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या मार्गदर्शनात महिला मोर्चाच्या महामंत्री सौ. प्रज्ञा गंधेवार संकल्पनेतून सौ. अनिता पुसाम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सौ. अनिता पुसाम व सोबत सूर्यवंशी ताई, भाग्यश्री ताई, माधुरीताई, आशिष दादा, रोशन दादा आकाश दादा या आठ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी सौ. मंजुश्री कासनगोटटूवार सौ. सीमा मडावी, योजना उईके, निशांत वाकडे, बंडू गोहकार या मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान केले. या सर्वांचे रक्तदान ग्रुप व भारतीय जनता पक्षाच्या वतीने खूप खूप अभिनंदन धन्यवाद.