महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू #chandrapur #gondpipari

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
गोंडपिपरी:- महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील सकमुर येथे घडली आहे. वारंवार तक्रार करुनही महावितरणाने कानाडोळा केल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृताच्या कुटुंबियांना मदत करा अन्यथा मृतदेह उचलू देणार नाही असा इशारा दिला.
राजेश्वर तोहोगावकर (59) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर येथील रहिवासी होते. राजेश्वर यांच्या शेतातून गेलेले पोल वाकल्याने विद्युत तारा जमीनीवर आल्या. त्यांनी तीन महिन्यापुर्वी याप्रकाराची महावितरणाकडे तक्रार दिली. नंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तेथील विद्युत पुरवठा खंडीत केला होता. जमिनीवर विद्युत तार असले तरी त्यात प्रवाह नसल्याची माहिती शेतकऱ्यांना होती. दरम्यान शेतात आलेला बैल हाकलण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा याच ताराच्या विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. आज दुपारी तीन वाजता हा प्रकार समोर आला. अन गावकऱ्यांनी आक्रमक भूमीका घेत महावितरण विरोधात संताप व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या