महावितरणचे कर्मचारी पुराच्या पाण्यात वीजपुरवठा पूर्ववत करण्यास तत्पर


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही मंडळात पुरस्थितीतमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कठीण परिक्षा पाहिली. परंतु न डगमगता महावितरणच्या अभियंता, कर्मचारी यांनी याही परिस्थितीमध्ये वीजपुरवठा ग्राहकांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात प्राधान्याने खांदाभर पाण्यात उतरुन ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. जंगलात, अंधारात, पुराच्या पावसात  त्यांनी कर्तव्य बजावले.
११ तारेखेपासून चंद्रपूर व गडचिरोली मंडळात उपकेंद्र, फिडर्स, रोहित्र लगेचच दुरुस्त करीत ग्राहकांना दिलासा दिला. यात महावितरच्या अभियंता व कर्मचारी यांना स्थानिक प्रशासनाने तसेच जनतेने सहकार्य केले व यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली. 
राजूरा उपकेंद्रांतर्गत वीरुर स्टेशन परिसरात आलेल्या पुरामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. विरुर स्टेशन डी. सी. अंतर्गत येणाऱ्या धानोरा गावठाण आणि कवितपेट गावात वीज नसल्यामुळे गावात विजेची समस्या निर्माण झाली होती. परंतु राजुरा उपविभागाचे  उपकार्यकारी अभियंता बडगु, व विरुर स्टेशनचे शाखा अभियंता मकासरे यांचा मार्गदर्शनात  लाईनमन पुरोहित व इतर कर्मचारी तसेच एजन्सी च्या ले माणसानी गावातील वीज पुरवठा सुरू करण्यात शरतीने प्रयत्न केले व त्यात त्यांना यश आले.
युथ फोरम धानोरा तर्फे आणि समस्त गावकरी मंडळी तर्फे वीज सेवा लवकर  सुरू करण्यात आल्या बद्दल मकासरे ,पुरोहित आणि कर्मचारी बालाजी कारेकर यांचे मनापासून गावकऱ्यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या