💻

💻

सुदाम राठोड यांनी घेतली पिडीत कुटुंबियांची भेट #chandrapur #Jivati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील गडपांढरवणी येथील इसम मारोती नारायण चिटगीर वय 45 वर्ष हे मागील झालेल्या अतिवृष्टी च्या पावसात शेतातून येताना नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि आई व लहान भाऊ असा आप्त परिवार आहे.
घरातील कर्ता धर्ता गेल्याने या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने या परिवारावर जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे तरी शासनाने या पीडित कुटुंबियांना 5 लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी असे आव्हान जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत