Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या लावारिस व्यक्तीला भाजपाने दिले जीवनदान #chandrapur #ballarpur


रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा या आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाक्याला प्रत्येक कार्यकर्ता अमलात आणणार: आशिष देवतळे
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील बस स्टँडच्या बाजूला वेंकटेश एम्पायर च्या समोर एक अज्ञात व्यक्ती पावसाने भिजवून बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे काही नागरिकांनी तिथे असल्याची माहिती भाजपा कार्यालयात दिली. त्यावेळी भाजपा कार्यालयात मान.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानंतर बल्लारपूर शहरात प्रत्येक वार्डात सुरू असलेल्या मदत कार्य संबंधी आढावा बैठक सुरू होती.

त्या बैठकीला थांबून संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी त्या अज्ञात व्यक्तीकडे धाव घेतली व त्वरित रुग्णवाहिका बोलावून त्या व्यक्तीला बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात नेले व त्या व्यक्तीचा इलाज केला तसेच डॉक्टरच्या सल्ल्यानंतर त्या व्यक्तीला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले व त्याचा इलाज केला.

याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सदस्य हरिशजी शर्मा, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजपा शहर महामंत्री मनीषजी पांडे, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष रनंजय सिंग, शहर महामंत्री घनश्याम बुरडकर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र सिंग खडका, माजी नगरसेवक एल्लैय्या दासरफ, माजी नगरसेवक विक्की दुपारे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत