२२ जुलै रोजी गडचांदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा #gadchandur

Bhairav Diwase


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- युगचेतना ग्रामविकास बहुद्देशीय संस्था संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे ब्रिटिश सरकारची ४५‌ जागतिक प्रतिष्ठेची चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळणारे देशातील पहिले तरुण वकील दिपक चटप, नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेतून नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या कोरपना तालुक्यातील रहिवासी प्रतीक बोर्डे यांचे मार्गदर्शन व सत्कार समारंभ कार्यक्रम दिनांक २२ जुलैला सकाळी ११ वाजता बालाजी मंगल कार्यालय गडचांदूर येथे होत आहे.
तरी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना यशाला गवसणी घालता येत नाही तरी ही सुवर्ण संधी न गमवता गडचांदूर परीसरातील विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन युगचेतना ग्रामविकास बहुद्देशीय संस्था संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर यांनी केले आहे.