नक्षलवाद्यांनी केली माजी सरपंचाची हत्या #Gadchiroli

Bhairav Diwase



गडचिरोली:- जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी जिम्मलगट्टा क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या दामरंचा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गेररा येथील रहिवासी माजी सरपंच रंगा मडावी या इसमाचे नक्षल्यांनी दि.‌२० जुलैला सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान धारधार शस्त्राने हत्या केली असून सदर घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .
सविस्तर वृत्त असे कि, मृत इसम हा एका बलात्कार आणि हत्येच्या आरोपात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचे वडील आहे. २९ मार्च २०२२ ला गेररा टोला तालुका भामरागड येथील एका अल्पवयीन युवतीचे बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात रंगा मडावी ला देखील पोलिसांनी अटक केली होती. सध्या जामिनावर बाहेर होता दरम्यान आज नक्षल्यांनी रंगा मडावी याची धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली आहे या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.