भद्रावती:- कराटेचे भीष्म पितामह दाई सेन्साई डॉ. मोसेस तिलक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व एलन तिलक शितोया कराटे स्कूल यांच्या संयुक्त वतीने मोसेस कप २०२२ नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन २४ जुलै स्थानिक अभिषेक मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
या स्पर्धेत विविध राज्यातील ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेकरिता शोसिहान निल मोसेस हॅन्शी सुनीलकुमार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
स्पर्धेकरिता ४० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच विविध राज्यातून येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.