काय हा रोड, काय ते खड्डे, काय तो चिखल, तरी पण विरूर स्टेशन गाव ओकेच!
ग्रामपंचायत कडून बातमीची दखल; लवकरच रस्त्याच्या कामाला होणार सुरुवात
राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरूर स्टेशन परिसरातील मागील आठवड्यापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे या परिसरात पाण्यामुळे प्रत्येक नाले व नदी पूर्णपणे भरले आहे. विरूर स्टेशन परिसरात अनेक गाव येतात त्या गावांमधील विरूर स्टेशन हा लोकसंख्येने मोठा गाव असून या गावात आठवडा बाजार भरपूर मोठ्या प्रमाणात भरतात. बस स्टॉप चौक ते छत्रपती शिवाजी चौक मार्केट रस्त्यावर खड्डे व चिखल झाल्याने वाहतूक करतांना नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. काय हा रोड, काय ते खड्डे, काय तो चिखल, तरी पण विरूर स्टेशन गाव ओकेच! म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती.
आधार न्युज नेटवर्कने काय हा रोड, काय ते खड्डे, काय तो चिखल, तरी पण विरूर स्टेशन गाव ओकेच! या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली. या बातमीची दखल ग्रामपंचायतीने येऊन तातडीची बैठक आज ४ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत येथे या रस्त्या संदर्भात बैठक आयोजित केली. या बैठकीत रस्त्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आधार न्युज नेटवर्क च्या ग्रामीण प्रतिनिधी ला दिली. आधार न्युज नेटवर्क च्या बातमी चा IMPACT ने विरुर स्टेशन बस स्टॉप चौक ते छत्रपती शिवाजी चौक मार्केट रस्त्याचं काम होणार असल्याने गावकरी आनंद व्यक्त केला. व आधार न्युज नेटवर्क ला धन्यवाद दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत