Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

सिमराज व इमली बार अँड रेस्टोरंन्टला नोटीस #chandrapur


चंद्रपूर:- दारूच्या रिकाम्या बाटल्या इमारतीच्या स्लॅबवर तसेच बाजुच्या खुल्या भुखंडांवर टाकल्याने सिमराज बार अँड रेस्टोरंन्ट व इमली बार अँड रेस्टोरंन्टला महानगरपालिकेतर्फे सफाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान सुमित्रा नगर येथील सिमराज व इमली बार अँड रेस्टोरंन्ट येथे दारूच्या रिकाम्या बाटल्या इमारतीच्या स्लॅबवर तसेच बाजुच्या खुल्या भुखंडांवर टाकलेल्या आढळल्या. मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा खच असल्याने त्यात पाणीही मोठ्या प्रमाणात साचुन असलेले निदर्शनास आले.
परिणामतः अश्या ठिकाणी डेंग्यु डासांच्या लारवांची उत्पत्ती होऊन शहरात डेंग्यु उद्रेक होण्याची शक्यता असल्याने त्या बाटल्यांची तात्काळ पर्यायी व्यवस्था करून परिसर स्वच्छ करण्याची नोटीस मनपामार्फत बजाविण्यात आली आहे.सदर प्रकार पुन्हा आढल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ तसेच साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत