पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघातात #chandrapur

Bhairav Diwase
महिलेसह दोन वर्षीय बालकांचा मृत्यू
चंद्रपूर:- पडोली-घुग्घुस मार्गावरील खुटाळा गावाजवळील राजस्थान फॅक्ट्रीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक बसली. या भीषण अपघातात महिलेसह दोन वर्षीय बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली.
या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. नम्रता निखील टावरी (25), लक्ष टावरी (2) असे मृतकांचे नाव आहे. तर निखील टावरी व कनक टावरी असे जखमींचे नावे आहेत. या घटनेमुळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.