Top News

अनामिक मद्यपी समूहाचे काम समाज बांधणीचे:- सुभाष कासनगोट्टूवार #chandrapur

चंद्रपूर:- समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी समाजस्वास्थ्य अबाधित राहावे यासाठी धडपडणाऱ्या अनामिक एए मद्यपी समूहाचे योगदान अनमोल असून मी मद्यापासून मुक्त झालो, मात्र इतर मद्यपीच्या जीवनात ही सुंदर सकाळ यावी ह्यासाठी हा समूह झटतो एकाप्रकारे समाजबांधणीचे काम करतो असे भाजप नेते व माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार ह्यांनी तुळशीनगर परिसरात सक्षम समूहाचा शुभारंभ करताना प्रतिपादन केले.
ते पुढे असेही म्हणालेत की कोणत्याही औषधीशिवाय केवळ सातत्यपूर्ण शेअरिंग द्वारे मद्यपी मद्यपाशातून बाहेर निघतो. त्यामुळे मद्यपी कुटुंब माता भगिनी ह्यांनी चंद्रपुरातील कोणत्याही मद्यपी समूहासोबत संपर्क साधावा असे कळकळीचे आवाहन केले. तसेच चंद्रपूर शहरात एए समूह साप्ताहिक बैठक मासिक व वार्षिक बैठकीकरिता अद्यावत सभागृह लवकरच लोकनेते सुधीरभाऊ ह्यांचे पुढाकाराने अस्तित्वात येईल असा आशावाद व्यक्त केला. व्यासपीठावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता श्रीराम पान्हेरकर होते. स्थापना कार्यक्रमाला मद्यपी परिवार व अनेकांची उपस्थिती लाभली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने