गोंडपिपरी तालुक्यातील राळापेठ येथील घटना
गोंडपिपरी:- आज दि. ९ जुलैला गोंडपिपरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली मुसळधार पावसासह मोठ्या प्रमानात विजा कडाडत होत्या.
गोंडपिपरी तालुक्यातील राळापेठ येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली. स्फोटासारखा आवाज आला. ही थरारक घटना आज सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी घडली.
सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळेजवळील नागरिक भयभीत झाले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या घटनेत अमर माधव राऊत (वर्ग ४), राशी विनायक ताजने (वर्ग ७), निशांत अंगुलमान उराडे (वर्ग ७) हे तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. वीज कोसळल्याने शाळेतील सर्व लाईन, टी व्ही, पंखे, सर्व विद्युत उपकरणे जळून खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत