Top News

पोंभुर्ण्यात शनिवारी महाआरोग्य शिबीर #pombhurna


भाजपा कडून शिबिराची जय्यत तयारी सुरू.

तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा; आयोजकांचे आवाहन
पोंभुर्णा:- माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जुलै रोजी पोंभूर्णा येथे भव्य रोगनिदान, शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, जि. प. आरोग्य विभाग, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, आयएमए चंद्रपूर, श्री माता कन्यका सेवा संस्था, लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगना, जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन चंद्रपूर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपूर, प्रयास लोक कल्याणकारी संस्था व जीवन आधार बहुउद्देशीय संस्था घुग्घूसच्या वतीने हे शिबिर होणार आहे.
शिबिरात आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा, स्त्रियांचे कॅन्सर, हृदयरोग, सांधेदुखी, अस्थिरोग, बालरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, नाक, कान व घसा, किडनी इत्यादी सर्व आजारांचे मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया व चष्मेवाटप शिबिरात करण्यात येणार आहे. शिबिरात दत्ता मेघे इंन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सावंगी मेघे वर्धा येथील नेत्ररोग तथा दंतरोग तपासणी व्हॅन उपलब्ध राहणार असून लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगना नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांची चमू आणि लता मंगेशकर दंत महाविद्यालय व शासकीय दंत महाविद्यालय नागपूर येथील मोबाइल डेंटल व्हॅन उपलब्ध राहणार आहे . आवश्यकतेनुसार रक्ताच्या संपूर्ण तपासण्या करण्यात येणार असून, पात्र व्यक्तींना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोज सुध्दा देण्यात येणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त 30 जुलै रोजी माजी जि.प अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी महाआरोग्य शिबीर ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे आयोजित केले आले आहे. त्या विषयी आढावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड आणि डॉ. अमोल पोतदार यांनी घेतला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, शालेय आरोग्य पथक अधिकारी डॉ. वडपल्लीवार, उपस्थित होते. तसेच भाजपा कडून शिबिराची जय्यत तयारी सुरू आहे.
याप्रसंगी मा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर कु.अल्काताई आत्राम, माजी उपसभापती विनोद देशमुख, नगरपंचायत उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय मस्के, चिंतलधाबा ग्रामपंचायत उपसरपंच रोशन ठेंगणे, जामखुर्द सरपंच बंडु बुरांडे, नगरसेवक दर्शन गोरंटीवार, रामेश्वर बारसागडे, सुमित धोपटे, राजु ठाकरे, तसेच लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ उपस्थित होते. तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने