पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील केमारा येथे वृक्ष लागवड करून वनमहोत्सवाची सुरूवात #pombhurna

Bhairav Diwase
३० हेक्टर जागेवर होणार वृक्ष लागवड
पोंभूर्णा:- मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर, वनपरिक्षेत्र पोंभूर्णा अंतर्गत येणाऱ्या केमारा नियत क्षेत्रात वृक्ष रोपन करून वनमहोत्सव अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नव्याने घेण्यात आलेल्या मिश्र रोपवनात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यात येणार असून पोंभूर्ण्यातील केमारा नियत क्षेत्र आता आणखी हिरवे गार होणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने एक महिन्यापर्यंत चालणाऱ्या वनमहोत्सव अभियानाची सुरुवात पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या केमारा नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ९९ मध्ये ३० हेक्टर जागेवर नव्याने घेण्यात आलेल्या मिश्र रोपवनात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठीच्या कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समितीच्या माजी सभापती अल्का आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वनमहोत्सव अभियानाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार क्षेत्र सहाय्यक आनंदराव कोसरे, वन संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रेमदास इष्टाम, रमेश वेलादी, धनराज बुरांडे, ग्रामपंचायत सदस्य मनिषा आलाम,मिरा पोरेते,लक्ष्मण शेडमाके,वैभव पिंपळशेंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी वनरक्षक शितल कुळमेथे, सुरेंद्र देशमुख,अजय ढवळे, राजेंद्र मेश्राम,दुष्यंत रामटेके,ममता राजगडे व सर्व वनकर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.