Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

घनोटी येथे दुसऱ्या दिवशी पुन्हा बिबट्याचा हल्ला #Pombhurna
पोंभूर्णा :- घनोटी नंबर १ येथे अंगणात बांधलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन बकऱ्यांना फस्त केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्रीनंतर घडली.सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
घनोटी नंबर १ येथील बेघर वस्तीतील कालीदास सोनटक्के यांच्या घराच्या अंगणात बकऱ्या बांधून होते. मध्यरात्रीनंतर एक वाजताच्या दरम्यान बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला चढवून दोन बकऱ्यांना ठार केले. बुधवारला याच बिबट्याने बेघर वस्तीतील गोठ्यात बांधून असलेल्या एका गाईला ठार केले होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत