Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

इरई येथे तात्काळ बस सेवा सुरु करा


युवा स्वाभिमान पार्टीचे कोरपणा पंचायत समिती सर्कल अध्यक्ष निखिल पिदूरकर यांची आगार प्रमुख तसेच DIVISION अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली मागणी 
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- तालुक्यातील इरई हे गाव अतिदुर्गम व आदिवासी भाग म्हणून ओळख असलेला इरई येथे  चंद्रपूर इरई बस तात्काळ सुरु करण्यात यावी.
         सध्या शाळा व कॉलेज सुरु झाले आहेत, शेतकरी वर्गाची पण शेती शाळा सुरु झाली आहे शेतीची अवजारे घेण्यासाठी चंद्रपूर या ठिकाणी जाव लागते पण बस सेवा सुरु नसल्याने जनतेला नहरकत त्रास सहन करावा लागत आहे.लोकल गाड्याने इरई येथील विध्यार्थी शाळा कॉलेजला जात असून त्याची आर्थिक लूट होऊन काही विध्यार्थी अजून पण शाळा कॉलेजला गेले नाही त्यामुळे चंद्रपूर, कवठाळा ते इरई बस सेवा तात्काळ चालु करण्यात यावी अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टी जे जिल्हाअध्यक्ष सुरज ठाकरे याच्या मार्गदर्शना खाली युवा स्वाभिमान पार्टीचे कोरपणा पंचायत समिती सर्कल अध्यक्ष निखिल पिदूरकर यांनी  आगार प्रमुख तसेच DIVISION  अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे दिनांक ०४/०७/२०२२ रोजी मागणी केली तरी त्याच्या कडून येत्या २ दिवस इरई येथे बस सेवा चालु करू असे सखारात्मक उत्तर दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत