माकडाने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी #gadchiroli

Bhairav Diwase

गडचिरोली:- रामनगर येथे वास्तव्यास असलेली महिला भारती मुनघाटे वय 30 ही महिला पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांच्या घरून सकाळी 9 वाजताच्या दरम्यान स्वयंपाक करून घरी जात असताना रामपुरी वॉर्ड कॅम्प एरिया येथे माकडाने आकस्मिक हल्ला करून तिला जखमी केले. व घटना माहीत झाल्याबरोबर तात्काळ तिला मनिषा प्रवीण चन्नावार यांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती केले असून तिच्यावर उपचार सुरू आहे.

यापूर्वी सुद्धा एका मुलावर माकडाने हल्ला केला होता. माकडे गावात येऊन लोकांवर हल्ला करीत असून वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत असून या परिसरात माकडांनी धुमाकूळ घातला असून लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी महिला गरीब असून तिला वनविभागाने त्वरीत नुकसान भरपाई भरपाई द्यावी अशी मागणी कटूंबियानी, वार्डातील नागरिकांनी केली आहे.