शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय तुकूम, चंद्रपुर च्या कंपाउंड प्रवेशव्दारासमोरील नालीवरचा पडलेला स्लॅब बांधुण पुर्ण करण्याची अभाविपची मागणी #chandrapur
पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. नाली पाण्याने तुडुंब भरत आहे अशा स्थिती मध्ये अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे अभाविप कार्यकर्ते तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला याबाबत तोंडी तक्रार केली त्यावेळी संबंधीत विभागाला महाविद्यालयांकडून तक्रार केली असुन, अनेक दिवसे लोटुनही अद्याप कार्यवाही झालेली नाही अस सांगण्यात आले. खुप दिवसे लोटुनही समस्या न सुटल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपुर महानगर च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका चंद्रपुरचे उपआयुक्त यांना निवेदन देण्यात आले व त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यामातुन देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत