💻

💻

विवेकानंद महाविद्यालयाच्या खेळाडूंनी वुडबॉल स्पर्धेत पटकावला सुवर्णपदक #chandrapur #bhadrawati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- राजस्थानातील जगन्नाथ विद्यापीठ जयपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुडबॉल स्पर्धेमध्ये येथील विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नुकतेच सुवर्ण पदक पटकावले.
      या खेळाडूंनी गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. या विजयी संघामध्ये महाविद्यालयातील खेळाडू  शुभांगी भोस्कर आणि गुलाबशाह सय्यद यांचा समावेश आहे. त्यांनी स्ट्रोक इव्हेंट मध्ये सांघिक सुवर्णपदक पटकावले.
      या विजयी खेळाडूंचे विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोराचे अध्यक्ष मोरेश्वरराव टेंमुर्डे, सचिव अमन टेंमुर्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे,  शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संगिता आर.बांबोडे, डॉ. टोंगे, डॉ. तितरे, डॉ. आस्टुनकर आणि महाविद्यालयातील समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत