जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांच्या गाडीचा अपघात #Chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांच्या गाडीचा अपघात नंदोरी नाक्यावर झाल्याची घटना दि. ७ जुलै ला दुपारी ती ३-४ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात जीवीत हानी झाली नसून गाडीच नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले नागपुर वरुन काम आपटून चंद्रपूरला पक्षाच्या बैठकीसाठी येत असताना नंदोरी नाक्यावर गाडी हळू केली असता मागून येणाऱ्या गाडीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. धडक जोरात होती मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. संध्याताई यांचे गाडीत त्यांचा मुलगा फिस्कुटी चे सरपंच नितीन गुरनुले हे सोबत होते.