Top News

तुम्हाला सुद्धा व्हाट्सअप वर अ‍ॅमेझॉनची गिफ्ट लिंक आलीय का? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर होऊ शकते तुमच्यासोबत फसवणूक.


व्हाट्सअप चा वापर सर्वच लोक करतात. परंतु या अ‍ॅपचा वापर करून सध्या मोठ्या प्रमाणात युजर्सची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सध्या व्हाट्सअप वर अ‍ॅमेझॉनकडून मिळणाऱ्या फ्री गिफ्टची लिंक व्हायरल होत आहे. अशी लिंक आली असेल तर काळजी बाळगा. कारण हा बनावट मेसेज असून यामुळे तुम्ही मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकता.
काय आहे ‘हा’ मेसेज?

व्हाट्सअप वरील त्या मेसेजमध्ये एक अ‍ॅमेझॉनची लिंक देण्यात येत आहे. त्याच्यावर क्लिक केल्यास तुम्हाला मोफत गिफ्ट जिंकण्याची संधी मिळणार असल्याचं लालच दिलं जात आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर एक सर्व्हेचे पेज ओपन होते. त्यावर वैयक्तिक माहिती घेतली जाते. युझरचे वय, अ‍ॅमेझॉनला तुम्ही किती रेटिंग द्याल, असे अनेक प्रश्न विचारले जातात. याशिवाय अँड्रॉईड फोन किंवा आयफोन यापैकी कोणत्या स्मार्टफोन वापरता, असा प्रश्नही विचारला जातो.
तसेच या पेजवर एक टायमर आहे, त्यामध्ये आपण फसतो. यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर युजरला त्यांच्या स्क्रिनवर काही गिफ्ट बॉक्स दिसतात. त्यावर क्लिक केल्यानंतर स्मार्टफोन जिंकल्याचे सांगितले जाते. परंतु हे गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला ते 5 ग्रुप किंवा 20 व्यक्तींसोबत शेअर करण्यास सांगितले जाते. अशा कोणत्याही सर्व्हेमध्ये अनेकदा युजरला कोणतेही गिफ्ट मिळत नाही. परंतु युजर यात अडकला जातो. या क्विझचं युआरएल नकली आहे. युजर्सची फसवणूक होऊ शकते. फसवणुकीपासून वाचण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने