कत्तलखान्यात जाणाऱ्या दोन ट्रकमधून ३५ जनावरांची सुटका; २३ लाखांचा माल जप्त #chandrapur

Bhairav Diwase

उमरी पोतदार पोलिसांची कारवाई

पोंभूर्णा:- तेलंगणा मार्गे जाणाऱ्या दोन ट्रकमध्ये अवैधरित्या प्राण्यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच उमरी पोतदार पोलिसांनी डोंगरहळदी पाईंटवर नाकाबंदी केली होती. या ट्रकमधून ३५ जनावरांची सुटका करण्यात आली.तसेच पाच आरोपी ना ताब्यात घेण्यात आले.
नागभीड मार्गे तेंलगानात अमानुष रित्या निष्पाप मुक्या जनावराची वाहतुक करताना टिएस -२० टि ६३१२ व टिएस. २० टि ६७३२ गाडीने नेत असताना तपासा अंतर्गत आढळले.
उमरी पोतदार पोलीस स्टेशन ने सदर दोन वाहन ताब्यात घेवुन ३५ जनावरांची वैद्यकीय तपासणी नंतर तोहगाव गोरक्षण समिती च्या ताब्यात दिले व संबंधित नासीर शेख बशीर वय ३४ रा.बल्लारपुर,वसंत रामभाऊ राऊत वय ३२ रा.विलम मसली नागभीड,जावेद रमजान खान पठाण वय ३१ शिवनगर नागभीड,निखिल विनोद मोराडे वय ३० विलम मस्ई नागभीड,पवन पितांबर अमृतकर वय ३२ भिमनगर नागभीड यांना ताब्यात घेवुन कलम ५(अ )१ २ ५(ब)महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सुधारीत २०१५ सहकलम ११(१)(घ)(ड)प्राण्यांना कृर्ततेने वागवण्याचा अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा नोदवण्यात आला.तसेच २३६५५५० रुपये चा जनावरे व वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढिल तपास एस. डी. एम. इगंळे याच्या मार्गदर्शनात ठाणेदार शेरकी, हेडकास्टेबल संजय, रविन्द्र, कास्टेबल राकेश, संदिप करीत आहेत.