Click Here...👇👇👇

शाळा व महाविद्यालय समोर तरुणीची छेड व टिंगल टवाडी करणाऱ्या रोड रोमिंयोचा बंदोबस्त करा:- सुरज ठाकरे #Rajura #chandrapur

Bhairav Diwase

राजुरा:- राजुरा शहरांमधील महाविद्यालय व शाळेच्या समोर विशेष म्हणजे शिवाजी महाविद्यालय‌ व इतर शाळेच्या समोर शहरातील काही रोड रोमिंयो हे महाविद्यालय व शाळा येथे शिक्षणाकरिता येत असलेल्या तरुणीची छेडछाड व टिंगल तटवाडी करीत असतात अशा तक्रार युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना गेल्या चार दिवसातून पासून सातत्याने प्राप्त होत आहे.
या मिळत असलेल्या तक्रारीची प्रत्यक्ष सुरज ठाकरे यांनी त्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली असता तक्रारीमध्ये सत्यता असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आपल्या पद्धतीने रोड रोमियोंचा बंदोबस्त करावा.
जेणेकरून शाळकरी व महाविद्यालयीन तरुणींना होत असलेला त्रास थांबेल अशी तक्रार युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन राजुरा यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना केली आहे.