Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पर्यटन स्थळ अमलनाला डॅम वर होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने घेतला आढावा #gadchandur


कोरपना:- पोलीस स्टेशन गडचांदूर अंतर्गत येत असलेला अंमलणाला डॅम भरल्यानंतर सदर डॅमचे वेस्ट वेअर पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात दरवर्षी पर्यटक येत असतात.
गेल्या वर्षी वेस्ट वेअर पाहण्याकरिता आलेले बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर येथील युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
सदर घटनेची भविष्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून डॅम भरण्याचे पूर्वी प्रशासनाकडून 6 जुलै ला जलसिंचन विभागाचे अभियंता सय्यद, गडचांदुर चे ठाणेदार सत्यजित आमले, सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी, स्थानिक नागरिक, पत्रकार यांच्याकडून आढावा घेण्यात आला, असून डॅमचे वेस्ट वेअर च्या पाण्याच्या प्रवाहातील धोकादायक खड्डे जलसिंचन विभागाकडून भरण्यात आले आहेत.
सदरचा डॅम अद्याप पावतो भरला नसून डॅम भरल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांनी खोल पाण्यात जाऊ नये, नशा करून पाण्यात उतरू नये, साफ सफाई ठेवावी असे आवाहन केले असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत