गुणवंत सत्कार सोहळा व करियर मार्गदर्शनचे आयोजन #chandrapur #mul

Bhairav Diwase
0


मुल:- भूमिपुत्र ब्रिगेड जि. चंद्रपूर, अ. भा. म. फुले समता परिषद चंद्रपूर (पूर्व), अ. भा. माळी महासंघ जि. चंद्रपूर तर्फे गुणवंतांचा सत्कार व दहावी बारावी नंतर काय? यावर करियर मार्गदर्शन कार्यक्रम येत्या 10 जुलै ला आयोजित करण्यात आले आहे.
समाजात हक्काचे विचारमंच मिळावे तसेच गुणवंतांना प्रोत्साहन मिळून चांगले करियर करण्याची प्रेरणा मिळावी या करिता सर्व बहुजन ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येते त्याचा एक भाग म्हणून दहावी, बारावी , पदवी, पदव्युत्तर, पी.एचडी. धारक व स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे.
तरी दहावी 90 टक्के व बारावी 85 टक्के तसेच प्रत्येक विद्यालय व महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थांनी आपली गुणपत्रिका मोबाईल क्र. 9021313242 या वर 8 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावी असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)