माजी जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांनी घनोटी नं. १ येथे भेट देऊन गावातील नागरिकासोबत केली चर्चा #pombhurna

बिबट्याने घरातील गाय व दोन बकऱ्या केले होते ठार
पोंभुर्णा:- माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी मौजा घनोटी नं. १ येथे भेट देऊन गावातील नागरिकासोबत चर्चा केली. बिबट्याने लोकवस्ती मध्ये येऊन गाय व दोन बकऱ्या ठार केले. गावातील लोकवस्ती मध्ये येऊन घरातील प्राण्यावर हल्ला चढवीत असल्याने गावातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेघर वस्तीमध्ये मध्यरात्री बिबट्याने गाय ठार केले.
सलग दुसऱ्या दिवशी कालिदास सोनटक्के यांच्या घरातील दोन बकऱ्या ठार केले. आहे. बिबट्या गावातील लोकवस्तीमध्ये येत असल्याने मानवीय हानी पोहचणार या भीतीने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तरी बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी माजी जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत